केंद्र आणि बीट स्तरावरील स्पर्धांमध्ये श्रावण नंबर 1 शाळेचे उज्ज्वल यश

*⚡कणकवली ता.११-:* स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने इयत्ता 5 ते 7, इयत्ता 8 ते 10 आणि इयत्ता 11वी ते 12 वी या स्तरांवर वक्तृत्व, निबंध, चित्रकला आणि रांगोळी अशा विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. या स्पर्धांचे केंद्र, प्रभाग, तालुका आणि जिल्हा अशा प्रकारचे स्तर केलेले आहेत. अशाप्रकारे संपन्न होत असलेल्या केंद्र आणि प्रभाग स्तरावर महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या शाळेने घवघवीत यश प्राप्त केले आहे. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी या गटामध्ये केंद्रस्तरावर रेवती सुनील लाड वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, तर अथर्व संतोष गवळी तृतीय, तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये नीरजा संजय परब प्रथम तर निबंध स्पर्धेत भक्ती नागेश परब प्रथम आणि चित्रकला स्पर्धेमध्ये अथर्व संतोष गवळी प्रथम तर संजीवनी सतीश बाईत तृतीय आलेली आहे. यानंतर आचरा प्रभागांमध्ये संपन्न झालेल्या प्रभाग स्तरावरील या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धेत रेवती सूनील लाड द्वितीय, रांगोळी स्पर्धेत नीरजा संजय परब प्रथम आणि निबंध स्पर्धेत भक्ती नागेश परब तृतीय आलेली आहे. या घवघवीत यशाबद्दल श्रावण गावचे सरपंच प्रशांत परब, उपसरपंच प्रमोद घाडी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संभाजी परब, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अजय परब, पोलीसपाटील धाकू दळवी, केंद्रप्रमुख नितीन कदम, विस्तार अधिकारी उदय दिक्षित या सर्वांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page