राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान यांचा भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांना टोला…
*⚡सावंतवाडी ता.०८-:* स्थानिक आणि बाहेरचे असा वाद करणे हेच भाजपचे काम असून, काच के घरो मे रहने वाले, दुसरो के घरो पे पत्थर फेका नही करते. अशा शब्दात स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यावर भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी बोलणे टाळावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापारी कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान यांनी लगावला आहे.
यावेळी ते म्हणाले की, खरे तर अजय गोंदावळे यांनी या विषयावर बोलणे हा मोठा विनोद आहे. मडूऱ्यातील नेत्याला शहरात निवडून देणारे मतदार परप्रांतीय कसे? याचा देखील खुलासा त्यानी करावा असे आवाहन हिदायतुल्ला खान यांनी अजय गोंदावळे यांना दिले आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आठवडा बाजारावर केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नये. फुटपाथवरील आठवडा बाजाराचा ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. याठिकाणी महिला, वृद्ध यांना गटारात उभं राहून बाजार करावा लागतो. यात त्यांना शारीरिक ईजा, अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे अजय गोंदावळे यांनी विपर्यास करून व्यापारी, नागरिकांची दिशाभूल करू नये. पुंडलिक दळवी हे व्यापारी असून त्यांना व्यापाऱ्यांची भावना जवळून माहित आहे. आठवडा बाजाराच विकेंद्रीकरण झाल्यानं त्याचा फटका फिरत्या व्यापाऱ्यांसह, स्थानिक व्यापारी, रिक्षावाले यांना याचा फटका बसतो. शहरातील स्थानिकांच्या अर्थचक्रावर याचा परिणाम होतो असं मत राष्ट्रवादी उद्योग व व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान यांनी व्यक्त केले.
