आंदुर्ल खिंड येथील प्रकार;पिंगुळी-पाट रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थ संतप्त
*⚡कुडाळ ता.११-:* आंदुर्ले खिंड येथे पिंगुळी पाट रस्त्याच्या दुर्दशे बाबत ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा ताफा अडवून व्यक्त केल्या संतप्त भावना पाट पिंगुळी रस्त्याची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांचे होणारे हाल याबाबत गेली दोन तीन वर्ष विविध माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. विमानतळ उदघाटन होण्यापूर्वी रस्ता सूस्थितीत केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थानी दिल्यावर मशीनरी आणून रस्ता काम सुरु करण्यात आले, परंतु विमानतळाचे उदघाटन झाल्यावर लगेच दोन दिवसांनी कामं थांबवून कॉन्टॅक्टर निघून गेला. याबाबत विचारणा केली असता अजून वर्क ऑर्डर मिळाली नसल्याचे उत्तर देण्यात आले. याचाच अर्थ लोकांची केवळ दिशाभूल करून उदघाटन आटोपले गेले.
त्यामुळे आज या मार्गांवरून पालकमंत्री जाणार अशी खबर लागल्यावर ग्रामस्थांनी आंदुर्ले खिंड येथून जाणारा पालकमंत्र्यांच्या गाडीचा ताफा थांबवून रस्त्याची स्थिती आणि प्रशासनाकडून केली जाणारी दिरंगाई त्यांच्या निदर्शनास आणून दिली, यावेळी ग्रामस्थांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या जवळ व्यक्त केल्या.
यावर पालकमंत्री यांनी संबंधित ठेकेदार आणि पीडब्लू अधिकारी यांच्याशी संपर्क यांची साडासडती घेतली. व रस्त्याचे काम १०ते१५न झाल्यास संबंधित ठेकेदारास ब्लॉकलिस्ट मध्ये टाकले जाईल . त्यामुळे येत्या १० दिवसात रस्त्याचे BBM आणि पुढील १५ दिवसात कार्पेट करून पूर्ण होणार अशी ग्वाही सर्व उपस्थितीत सर्व पक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांना देण्यात आली. परंतु एका महिन्यात काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडन्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
यावेळी कुडाळ माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, तेंडोली सरपंच मंगेश प्रभू, म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ, आंदुर्ले माजी सरपंच सौ. आरती पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर तांडेल, श्री. रत्नाकर प्रभू, जगदीश म्हापणकर, अक्षय तेंडोलकर,मिलिंद निर्गुण, महेश पाटकर, दत्ता पाटकर, संजय सर्वेकर, अमित गावडे,पाट माजी सरपंच सौ. कीर्ती ठाकूर, नागेश आरोलकर, अनिल भगत, निलेश मुणगेकर, विनायक नांदोस्कर, श्यामसुंदर राऊळ, संतोष गोडे, प्रसाद सर्वेकर, गणेश राऊळ, विशाल राणे, माड्याचीवाडी माजी सरपंच दाजी गोलम, हुमरमाळा येथील शेखर परब, श्रीधर मराळ, प्रेमानंद सावंत आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
