महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न…

रोटरी क्लब कणकवली आणि नियोजित रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते आयोजन…

वैभववाडी प्रतिनिधी रोटरी क्लब कणकवली व नियोजित रोटरी क्लब वैभववाडी यांच्यावतीने आज वैभववाडी येथे महिला वर्गासाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गुळेकर लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या माध्यमातून रक्त दाब, शुगर व इतर तपासण्या करण्यात आल्या. यावेळी डॉ. विद्याधर तायशेटे व डॉ दिपा पाटील यांनी महिलांची प्रत्यक्ष तपासणी केली व गर्भाशयाचा कॅन्सर, कॅन्सरच्या गाठी, ब्लड कॅन्सर याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य विभाग वैभववाडी व रोटरी क्लब कणकवली व नियोजित रोटरी क्लब वैभववाडी यांच्या मार्फत कॅन्सर पुर्व तपासणी बाबत तालुकास्तरीय भव्य कॅन्सर शिबिर आयोजित करण्याचे ठरले.वैभववाडी तालुक्यातील साधारणतः १५० ते २०० महीलांनी या शिबिराचा लाभ घेतला. कॅन्सर पुर्व तपासणीस महिलांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता रोटरी क्लबचा हेतू सफल झाला असे मत डॉ विद्याधर तायशेटे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्याधर सावंत यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत संजय रावराणे यांनी केले. नियोजित रोटरी क्लब वैभववाडी चे अध्यक्ष संतोष टक्के यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कणकवली रोटरी क्लब चे अध्यक्ष विद्याधर तायशेटे, नियोजित रोटरी क्लब वैभववाडीचे अध्यक्ष संतोष टक्के, वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल पवार, कणकवली रोटरी क्लबचे मुसळे सर, डॉ.दिपा पाटील, गुळेकर लॅबोरेटरी चे अमोल सुतार, ऋषभ उपाध्ये विद्याधर सावंत, संजय रावराणे, मंदार चोरगे, उपस्थित होते.

You cannot copy content of this page