*⚡कणकवली ता.०६-:* जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्री. बगाटे यांच्या उपस्थितीत तसेच कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पो.कैलास इंफाळ यांचे अभिनंदन केले. आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील काकडे हॉटेल मध्ये गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरला आग लागून होणारा अनर्थ टळला. आणि म्हणूनच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यावेळी सोबत कणकवली तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष निलेश मालंडकर, प्रदिप कुमार जाधव, संदीप कदम, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलिस कैलास इंफाळ यांचा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी केला सत्कार
