रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक उर्फ माधव अभ्यंकर यांची उपस्थिती राहणार
*⚡कणकवली ता.०६-:* इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर आयोजित आय.एस.बी.एन. नोंदणीकृत संमेलन कला,साहित्य, सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन, कोल्हापूर यांच्यावतीने विविध क्षेत्रात आपल्या कृतिशील कार्यातून प्रतिमा निर्माण करून समाजाला दिशा देण्याचे व असामान्य अलौकिक कार्य करणाऱ्या कार्यवीरांचा रविवार 26 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12. वा. राजश्री शाहू स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर.येथे राञीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईक यांच्या भूमिकेतील अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमात देश-विदेशात तीन महनीय व्यक्तींच्या सह्यांचा संग्रह त्याचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे निमंत्रित कवींचे कवी संमेलन पुस्तक प्रकाशन व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था व व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. तरी आपली नावे समृद्धी प्रकाशन, सिंधुदुर्ग 9421189821, 9359337468 यावर 15 डिसेंबर पर्यंत पाठवावी. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. यासाठी सहयोगी संस्था गोवा महाराष्ट्र येथील म्हणून आयोजन सत्रात सहभागी होणार आहेत.
