आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास…
*⚡कुडाळ ता.०५-:* कुडाळ नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने जय्यत तयारी केली असून, शिवसेना १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागांवर लढणार आहे. यावेळी जर काँग्रेस सोबत आली तर त्यांनाही सन्मानजनक जागा देण्यात येतील. त्यामुळे कुडाळ मध्ये जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीचं सत्ता स्थापन करेल असा विश्वास माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
