*⚡बांदा ता.०५-:* ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’तर्फे रक्तदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे. मित्र किंवा मैत्रिणीला रक्तदानाचे तसेच अवयवदानाचे महत्व सांगणारे पत्र असे विषय यासाठी देण्यात आले आहेत. शालेय गट पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व खुला गट १८ वर्षेवरील असा आहे. पत्र लिहिताना शालेय गटासाठी आंतरदेशीय पत्रावरच लिहिणे आवश्यक आहे. खुल्या गटासाठीचे पत्र आखीव कोऱ्या कागदावर असावे. सुवाच्य अक्षरात हे पत्र लिहावे. पत्राच्या उजव्या कोपरात आपला संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांकासह लिहावा. पत्राच्या सुरुवातीला अगदी वर ‘रक्तदान, अवयवदान जागृती स्पर्धा २०२१’ असे लिहावे. शालेय गटासाठी १००० ते १२०० शब्दमर्यादा आहे. खुल्या गटासाठी १२०० ते २००० शब्दमर्यादा आहे. सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यशस्वीताना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ परितोषके दिली जातील. शालेय गटासाठी प्रमाणपत्र व रोख ५०१, ३०१, २०१ व १०१ रुपये प्रमाणे बक्षिसे दिली जातील. खुल्या गटासाठी प्रमाणपत्र व रोख १५०१, १२५१, ११११ रुपये व ७५१ रुपयेची तीन बक्षीसे दिली जातील. प्रकाश तेंडोलकर, अध्यक्ष, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, सिंधुसदन १२५१, सुळभाटले, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पिन ४१६५११ या पत्त्यावर दिनांक २० डिसेंबरपर्यंत पत्र पाठवायचे आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर (मो. ७७२१८५१३०४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
रक्तदान व अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी पत्रलेखन स्पर्धा
