वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी न.पं. निवडणुकीसाठी भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी येथील पक्ष कार्यालयात मोठी गर्दी केली होती. महिला उमेदवारांची संख्या ही मोठी होती. या मुलाखत प्रसंगी आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते. नगरपंचायतीच्या सतरा प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. सतरा प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. उमेदवारी मिळेपर्यंत उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. पक्ष कार्यालयाबाहेर यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न…
