खासदार राऊत यांनी वैभववाडीतील तो फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनाही लावावा…

आमदार नितेश राणे यांचे पत्रकार परिषदेत आवाहन…

वैभववाडी -: शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांवर व आमदारांवर भ्रष्टाचार व बलात्काराचे आरोप आहेत. त्यामुळे विनायक राऊतांनी वैभववाडीतील तो फाँर्मूला मुख्यमंत्र्यांनाही लावावा. आणि त्यांनाच जबाबदार धरावे. अशी रोखठोक प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला दिली.

वैभववाडी भाजपा कार्यालयात आमदार नितेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची पत्रकार परिषद पार पडली. शनिवारी खा. विनायक राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी वैभववाडी शहराचा विकास करण्यात सत्ताधारी अपयशी ठरले. अशी टीका त्यांनी केली होती. सत्तेतील सहा नगरसेवक फोडून तुम्ही शिवसेनेत घेतलात. त्या अपयशाला ते जबाबदार नाहीत का? असा प्रश्न पत्रकारांनी राऊत यांना विचारला होता. त्यावर ते नगरसेवक जबाबदार नाहीत. त्यांचा बॉस जबाबदार अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली होती.

आज नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. विनायक राऊत यांचा अभ्यास फार तोकडा आहे. राज्य सरकारने या न.पं. ला किती निधी दिला तेही त्यांनी जाहीर करावे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आहेत. संजय राठोड हे सेनेचेच मंत्री होते. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. असे अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. मग या सर्वाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत का ? असा सवाल त्यांनी रावतांना केला. फोटो – नितेश राणे

You cannot copy content of this page