वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज पार पडले. दरम्यान वैभववाडी शहरातील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी फीत कापून तर संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी श्रीफळ फोडून उद्घाटन केले. यावेळी कणकवली देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, निवडणूक निरिक्षक संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुका अध्यक्ष नासीर काझी जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, माजी वीत्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, उपसभापती अरविंद रावराणे, माजी सभापती दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, सुधीर नकाशे, बंड्या मांजरेकर, किशोर दळवी व आजी माजी सभापती, भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो – वैभववाडी येथे भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना जिल्हाध्यक्ष राजन तेली. यावेळी उपस्थित आमदार नितेश राणे, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी व पदाधिकारी छाया संजय शेळके वैभववाडी
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन…
