स्वानंद सुखनिवासी भालेकर समाधी मंदिराचे ७ रोजी उदघाटन

आदिनाथ वारकरी सांप्रदायच्यावतीने उभारणी

वैभववाडी प्रतिनिधी आदिनाथ वारकरी सांप्रदाय यांच्यावतीने स्वानंद सुखनिवासी ब्रम्हमूर्ती गुरुवर्य ह.भ.प.दत्ताराम महाराज भालेकर यांच्या समाधी मंदिराचे उद्दघाटन व १७ वा पुण्यतिथी सोहळा दिनांक ७ ते ९ डिसेंबर २०२१ रोजी भोम येथे आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त दररोज सकाळी काकड आरती, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, जागर असे कार्यक्रम होणार आहेत.मंगळवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी स्थापना संकल्प व पुण्याह वाचन, मुर्ती स्थापना, प्राण प्रतीष्ठा, होम हवन, पुर्णाहुती व आरती, कलश रोहण ह.भ.प.रवींद्र महाराज सुकाळी ( आळंदी) यांच्या हस्ते होणार आहे.सायंकाळी ४ ते ५ वा.ह.भ.प.संदेश महाराज वाफेलकर ( ताम्हाणे) यांचे प्रवचन.तर ५ ते ६ वा.सामुदायिक हरिपाठ होईल.सायंकाळी अजित बुवा गोसावी तिवरे कणकवली यांची अभंगवाणी कार्यक्रम आहे.तर राञौ ह.भ.प.विश्वास महाराज जामदार ( भोम ) यांचे किर्तन होईल.

बुधवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी गिता महात्म्य विष्णू सहस्ञनाम, तर सकाळी १० ते १२ दरम्यान ह.भ.प.चांगदेव महाराज काकडे ( जालना) यांचे पुष्पांजली किर्तन होणार आहे.दुपारी १२ ते १ वा.वारकरी भजन मालिका प्रकाशन, तर सायंकाळी ४ ते ५ ह.भ.प.सुरेश महाराज सावंत ( मुंबई ) यांचे प्रवचन,तर राञौ ह.भ.प.रमेश महाराज शिवापूरकर( पंढरपूर) यांचे जागर किर्तन होणार आहे.गुरुवार दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वा.काल्याचे किर्तन ह.भ.प.अनंत महाराज मोरे ( मौंदे) तर दररोज दुपारी व राञी महाप्रसाद आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन आदिनाथ वारकरी सांप्रदाय संचालक गुरुवर्य ह.भ.प.मारुती महाराज भालेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page