शिवसेनेने सन्मान केला तर ठीक अन्यथा एकला चलो रे

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नगरपंचायत निवडणूक अपडेट

वैभववाडी प्रतिनिधी या नगरपंचायत निवडणूकीत सत्ताधारी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीची आग्रही भूमिका आहे.माञ शिवसेनेकडून सन्मानजनक पर्याय आला नाही.तर स्वतंत्र निवडणूक लढविण्याची राष्ट्रवादी काॕग्रेसची तयारी आहे.अशी माहीती राष्ट्रवादी काॕग्रेस प्रदेश संघटक काका कुडाळकर यांनी दिली आहे. वैभववाडी येथील राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत कुडाळकर बोलत होते.यावेळी विधान सभा मतदार संघ अध्यक्ष डाॕ.अभिनंदन मालंडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, कृषी संघटना जिल्हाध्यक्ष समिर आचरेकर, सरचिटणीस तथा तालुका निरीक्षक रुपेश जाधव, तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण, शहर अध्यक्ष अशोक शिंदे,युवा शहर अध्यक्ष वैभव रावराणे, रविदास पवार, साजिद पाटणकर, नंदू पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कुडाळकर पुढे म्हणाले, आगामी वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीच्या संदर्भात तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पदाधिका-यासमवेत चर्चा केली.निवडणूकी संदर्भात एक ढोबळ आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याशी विचारविनिमय करुन येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.भाजपा प्रेरित सत्ता केंद्र महाविकास आघाडीकडे खेचून आणण्याचे काम केले जात आहे.त्याचप्रमाणे या ठिकाणी महाविकास आघाडी व्हावी ही भूमिका असून यासाठी आम्ही आग्रही आहोत. आगामी निवडणूकीसाठी काॕग्रेसने स्वबळाची घोषणा केली आहे.त्यांच्या भूमिकेचा आदर ठेवून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे.हुकुमशाही पध्दतीने वागणाऱ्या केंद्र सरकारला व भाजपला धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीची गरज आहे.त्यामुळे काॕग्रेसने आपली भूमिकेचा फेरविचार करावा.आघाडीसाठी चांगली भूमिका घ्यावी.असा सल्ला त्यांनी जिल्हा काॕग्रेसला दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंञी अमित सामंत महाविकास आघाडी बाबत फार आग्रही आहेत.काॕग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षानी एकञ येऊन काम करावे.अशी त्यांची इच्छा असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. उमेदवारी बाबत राष्ट्रवादीकडून कोणतीही अवाजवी मागणी केली जाणार नाही.उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता , भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्याची क्षमता विचारात घेऊ.संख्या बळाचा आग्रह आम्ही धरणार नाही.सत्ताधारी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न कले जातील.नगरपंचायत निवडणूकीत सध्य स्थितीत प्राथमिक माहीतीनुसार सहा सात ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद आहे.माञ भाजला सत्तेपासून दूर ठेवणे हा मुख्य उद्देश असल्यामुळे तडजोड केली जाईल.असे त्यांनी एका प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले. काॕग्रेसने आघाडीत येण्यास नकार दिला तरीही आम्ही शिवसेने सोबत आघाडीसाठी राष्ट्रवादी आग्रही राहील.असेही कुडावकर यांनी पञकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील सत्ताधा-यांनी येथील जनतेचा भ्रम निराश केला आहे. राज्यात सत्ता असलेल्या पक्षाकडे येथील जनतेने सत्ता दयावी.असे सांगत ते पुढे म्हणाले वैभववाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून मोठा निधी आणण्याचे काम करु. पाच वर्षापूवी निवडूण दिलेले आमदार विरोधी पक्षात होते.तिच परिस्थिती आज आहे.त्यामुळे सत्तेकडे संधी देण्याचे काम येथील नागरीकांनी करावे.असे आवाहनही त्यांनी केले.

You cannot copy content of this page