८ रोजी महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर

कणकवली व वैभववाडी रोटरी क्लबचे आयोजन;आंबेडकर स्मारक भवन येथे नियोजन

वैभववाडी प्रतिनिधी रोटरी क्लब कणकवली सेंटर व नियोजित रोटरी क्लब वैभववाडी यांच्यावतीने बुधवार दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी २ ते ४ वा.डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात महिलांची कॕन्सरपूर्व तपासणी करण्यात येणार असून ज्यांना मेमोग्राफी करण्याची गरज आहे.त्यांची मोफत मेमोग्राफी करण्यात येईल.यासाठी दिनांक ९ ते १० डिसेंबर या कालावधीत पडवे हाॕस्पीटल येथे करण्यात येईल.यासाठी वैभववाडीतून हाॕस्पीटल पर्यंत जाण्या येण्याची मोफत सोय करण्यात आली आहे.तसेच ब्लड शुगर, उच्च रक्तदाब , एच.बी.तपासणी मोफत करण्यात येणार आहे. महिलांनी कोणतीही भिती व संकोच न बाळगता कॕन्सरपूर्व तपासणी करुन घ्यावी आणि भयमूक्त जीवन जगावे असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॕ.विदयाधर तायशेटे यांनी केले आहे.या शिबीरासाठी डाॕ.दीपा पाटील, प्रशांत गुळेकर, संजय रावराणे , संतोष टक्के यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page