तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांची माहिती…
दोडामार्ग ता.०२सुमित दळवी-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कसई दोडामार्ग नगर पंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक पार पडली असून झालेल्या चर्चेत १७ जागा लढवण्याचा निर्णय झाल्याचे तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांनी जाहीर केले आहे.
ते पुढे म्हणाले की, आरक्षणानुसार उमेदवार चाचपणी करण्यात आली आहे. सेवाभावी, सामाजिक कार्यकर्ते, उच्चशिक्षित, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. असे या बैठकीत ठरवण्यात आले. आज दोडामार्ग नगर पंचायत प्रत्येक वॉर्डामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. आणि सत्ताधारी पूर्ण पणे अपयशी ठरले आहेत.तसेंच उमेदवारी वरून अंतर्गत मतभेद नाराजी ऐकायला मिळत आहे.
त्याच फायदा मनसेला होणार असून नगरपंचायत मध्ये सक्षम पर्याय मनसेच असेल असेही ते म्हणाले. या बैठकीस जिल्हा अध्यक्ष धीरज परब, तालुका अध्यक्ष सुनील गवस, जगन्नाथ गावडे, गुरुदास गवंडे,पांडुरंग उर्फ अभि खांबल, सुनिल गवस, नारायण गवस आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
