हिमानी परब हिने घेतलेल्या कष्टाचे फळ म्हणजे तिचा नागरी सत्कार

गुरुवारी बीबीषण पाटील यांचे प्रतिपादन;अर्जुन पुरस्कार मिळल्यानिमित्त कसाल येथे हिमानीचा झाला नागरी सत्का

ओरोस-:मल्लखांब सारख्या उपेक्षित राहिलेल्या लाल मातीतील खेळाला राजाश्रय देण्याचे काम हिमानीचे गुरू उदय देशपांडे यांनी केले.तर त्याला मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या अशा अर्जुन पुरस्कारा पर्यंत नेण्याचे काम येवढ्या कमी वयात हिमानी या सिंधुदुर्ग कन्येने केले आहे. हे सोपे नाही. याला प्रचंड मेहनत लागते. ती या गुरू शिष्याने घेतली आहे. या पुरस्काराने सन्मानित हिमानीचा तिच्या कसाल या गावाने असा भव्य सत्कार केला म्हणजे हिमानीने केलेल्या कष्टाचे खरे फळ असल्याचे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गुरुवर्य बीबिषण पाटील यांनी केले.

कसाल वाजरेवाडी येथील कन्या हिमानी उत्तम परब हिने आपल्या कमी वयात मल्लखांब या खेळात मानाचा असा अर्जुन पुरस्कार मिळविला आहे. अलीकडेच देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्याहस्ते हा पुरस्कार हिमानी हिला प्रधान करण्यात आला. या निमित्ताने गुरुवारी हिमानी परब हीचा सत्कार कसाल पंचक्रोशी ग्रामस्थ, कसाल ग्रामपंचायत, कसाल शिक्षण संस्था, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेन्ट्रल, कसाल विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. कोल्हापूर येथील शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आणि तब्बल १८ शिव छत्रपती पुरस्कार मिळविणारे शिष्य बनविलेले गुरुवर्य बिबिशण पाटील तसेच हीमानीचे गुरू उदय देशपांडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर वकील परब, प्रभाकर सावंत, अवदुत मालंडकर, डॉ प्रशांत कोलते, राजन परब, नंदकुमार गावडे, यशवंत परब आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभाचे प्रास्ताविक आणि मानपत्र वाचन प्रभाकर सावंत यांनी केले. मान्यवरांचे स्वागत कसाल सरपंच संगीता परब, सतीश बागवे आणि विवेक बालम यांनी केले. तर हायस्कूलच्या महिला शिक्षकांनी हिमानी आणि मान्यवरांचे औक्षण केले. सूत्रसंचालन प्रा निलेश महेंद्रेकर यांनी केले.

तर या समारंभाच्या यशस्वितेसाठी कसालं पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, सचिव यशवंत परब, प्रभाकर सावंत, सतीश बागवे, गोपाळ हरमलकर, नवीन बांदेकर, अवधूत मालंडकर, डॉ कोलते, कसाल उपसरपंच दत्ताराम सावंत, विवेक बालम, राजन परब, सत्यवान परब, बाळा कांदळकर, श्रीकृष्ण सावंत, प्रदीप सावंत, गोट्या मर्तल, संजीव राणे तसेच न्यू इंग्लिश स्कूल कसालचे मुख्याध्यापक गुरुदास कुसगांवकर आणि त्याचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. यशस्वी होण्यासाठी जिद्द महत्वाची : हिमानी परब आपण जे धेय्य ठरऊ त्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्या दिशेने आपल्याला पूर्ण झोकून द्यावे लागते. सुरुवातीला बऱ्याच स्पर्धांमध्ये मला अपयश यायचं. त्यामुळे घरी आल्यावर मी खूप रडायची पण कधीही जिद्द सोडली नाही. आपल्याला यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल याकडे लक्ष दिले.

यासाठी मला माझे आई वडील आणि गुरू तसेच मोठी बहीण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. एखाद्या खेळाडूला त्याच्या व्यायामशाळेत जे आवश्यक आहे ते सर्व मिळते मात्र घरी आल्यावर ही तसाच माहोल मिळणे आवश्यक आहे आणि ते मला माझ्या घरी पुरेपूर मिळाले. मल्लखांब हा मान आणि शरीरावर चांगले परिणाम घडवते. त्यामुळे प्रत्येकाने एकदातरी मल्लखांब खेळावा असे सांगतानाच माझ्या गावाने केलेला हा सत्कार माझ्या नेहमीच ध्यानात राहील आणि या सत्कारमुळे मला अजून काही करण्याचे बळ मिळाले आहे असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब हिने सत्कारानंतर बोलताना केले.

You cannot copy content of this page