*⚡कणकवली ता.०२-:* महाराष्ट्र् शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमधून सन – २०१७ – १८ साली खारेपाटण ग्रामपंचायतीला मंजूर झालेल्या संभाजी नगर टाकेवाडी खारेपाटण नवीन नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ तथा लोकार्पण सोहळा खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते पार पडला. सुमारे ५८ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन साठवण टाकी तसेच नळपाणी पुरवठा योजना उदघाटन कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या सौ. तृप्ती मळवदे ,खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम,ग्रा.प.सदस्य महेंद्र गुरव,शमशुद्दीन काझी,शंकर राऊत,सौ.अंजली कुबल,उज्ज्वला चिके,रीना ब्रम्हदंडे,आरती शेट्ये,फरहाना सारंग,माजी सरपंच किशोर माळवदे, खारेपाटण ग्रामविकास अधिकारी जि सी वेंगुर्लेकर आदी मान्यवर उवस्थित होते. तसेच विजय देवस्थळी,पंडित कुबल,दत्ताराम गुरव,संतोष पाटणकर,श्रीधर गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने साजरा बाई डोंगराच्या वर नवीन बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये जल व फुले सोडून नळ पणी पुरवठा योजनेचा शुभारंभ ग्रा प महिला सदस्याच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी खारेपाटण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उलस्थित होते.
खारेपाटण ग्रामपंचायतीच्या नवीन नळपाणी पुरवठा योजनेमुळे गावातील नागरिकाना आता रोज स्वच्छ आणि चांगले पाणी मीळणार असुन खारेपाटण ग्रामपंचायतीचे माझे सर्व सहकारी ग्रा प सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून आज गावाला नवीन नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळणार असल्यामुळे असपणाला समाधान वाटत असल्याचे खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी सांगितले.
