स्पर्धेला ज़िल्हाभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;19 वर्षे वयोगटात मनीष निरावडेकर, पल्लवी निरावडेकर यांची बाजी
*⚡सावंतवाडी ता.०१-:* सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मुक्ताई अॅकेडमीच्यावतीने आयोजित 19 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर विजेता ठरला. सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविदयालयातील स्पोर्ट्स काँम्प्लेक्स हाॅलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा सहा गटात खेळविण्यात आली.
विजेत्यांसाठी रु.5,500 रकमेची 20 बक्षिसे,5 ट्राॅफीज,15 मेडल्स आणि प्रशस्तिपत्रं देण्यात आली. स्पर्धेत वैभववाडी, देवगड, इत्यादी सर्व तालुक्यातील 58 मुला-मुलींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे 7-8 वर्षांच्या मुला-मुलींचा स्पर्धेत लक्षणीय सहभाग होता. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे आयुर्वेदाचार्य डाॅ. संजीव गवंडे, सिधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक सुर्यकांत पेडणेकर, प्रा. अजित व्हनमाने, कणकवलीतील श्री चेस अॅकेडमीचे श्रीकृष्ण आडेलकर, अॅकेडमीच्या संचालिका स्नेहा पेडणेकर, संचालक कौस्तुभ पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
स्पर्धा सहा फे-यात खेळविण्यात आली. बाळकृष्ण पेडणेकर सहा गुण घेऊन स्पर्धेचा विजेता ठरला. इतर गटात वरद कामत, तनिष्का आडेलकर, राजेश विरनोडकर, पल्लवी निरावडेकर आणि मनिष निरावडेकर विजेते ठरले. पल्लवी निरावडेकर हीने आभार मानले. बक्षिस विजेते पुढीलप्रमाणे मुख्य गट = प्रथम – बाळकृष्ण पेडणेकर, सावंतवाडी; द्वितीय – भावेश कुडतरकर, सावंतवाडी; तृतीय – मिलींद सावंत,सावंतवाडी; चौथा – आयुष राठोड, सावंतवाडी; पाचवा – आर्यन परब,सावंतवाडी; 19 वर्षे मुले = प्रथम – मनिष निरावडेकर, सावंतवाडी; द्वितीय – कौस्तुभ गावडे, सावंतवाडी; तृतीय – आदित्य परब,सावंतवाडी; 19 वर्षे मुली = प्रथम – पल्लवी निरावडेकर, सावंतवाडी; द्वितीय – वैष्णवी तवटे, कणकवली; तृतीय – श्रेया शेळके,वैभववाडी 15 वर्षे मुले = प्रथम – राजेश विरनोडकर, सावंतवाडी; द्वितीय – आयुष पेडणेकर तृतीय – स्वानंद जोशी 13 वर्षे मुली = प्रथम – तनिष्का आडेलकर द्वितीय – भुमि कामत, सावंतवाडी; तृतीय – सौम्या हरमलकर, सावंतवाडी; 11 वर्षे मुले = प्रथम – वरद कामत, सावंतवाडी; द्वितीय – वरद तवटे तृतीय – अनुज व्हनमाने
