ग्रामस्थांच्या सहकार्याने परबवाडा येथे बंधारा

वेंगुर्ला ता.०१-: परबवाडा-कणकेवाडी ओहोळावर ग्रामस्थांनी ‘पाणी अडवा – पाणी जिरवा‘ या सामाजिक कार्यासाठी बंधारा बांधला. या उपक्रमासाठी परबवाडा माजी उपसरपंच संजय मळगावकर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, जीवन परब, मनवेल फर्नांडिस, कृष्णा साटेलकर, रवी कोणेकर, विठ्ठल परब, देविदास मेस्त्री, नितीन आजगावकर, सीताराम परब, राजा परब, माहेश गावडे, दशरथ राठोड यांच्यासह ग्रामस्थांनी मेहनत घेतली. या बंधा-यामुळे आजूबाजूच्या विहिरीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

You cannot copy content of this page