*⚡कणकवली ता.०१-:* भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रज्ञा ढवण यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र बुधवारी दाखल केले. राजन तेली हे माजी आमदार आहेत,तसेच गेल्या जिल्हा बँक निवडणुकीत चांगली लढत त्यांनी दिली होती. प्रज्ञा ढवण या गेली ३० वर्षे राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत अनेक पदे भूषवली आहेत. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, गुरुनाथ पावसकर, सुहास सावंत आदी उपस्थित होते. या निवडणुकीत सर्वप्रथम ३ उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपने आघाडी घेतली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी राजन तेली व प्रज्ञा ढवण यांचे नामनिर्देशनपत्र दाखल
