बॅ.खर्डेकर महाविद्यालयात एन.सी.सी.डे संपन्न

वेंगुर्ला ता.०१-: बॅ. खर्डेकर महाविद्यालयात एन.सी.सी.डे. साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी मठ येथील माजी सैनिक देवेंद्र गावडे यांचा भारतीय सैन्यात सेवा केल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.

माजी सैनिक गावडे यांनी भारतीय सैन्यात अनुशासनातेला किती महत्त्व आहे ते सांगून एन.सी.सी कॅडेटसना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ए.एन.ओ.लेफ्टनंट डॉ.बी.जी गायकवाड यांनी एन.सी.सी.च्या प्रथम वर्षात निवड झालेल्या कॅडेट्सचे स्वागत केले तर सी.पी.एल. कोमल खुडपकर ने एन.सी.सी.डे चे महत्व सांगितले व जे.यू.ओ.निकिता कोरगावकर हिने एन.सी.सी. मुळे भविष्यात मिळणा-या संधी बद्दल मत व्यक्त केले. एस.यु.ओ.श्रीराम गावडे यांनी सूत्रसंचालन तर अनिकेत बेटगीर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page