अज्ञाता विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
*⚡देवगड ता.२८-:* अज्ञात इसमाने घराच्या समोरील दरवाज्याचा नागोसा वाकवुन दरवाजा उघडून त्या वाटे घरात प्रवेश करून आपल्या घरातील रोख रक्कम चोरून नेली व जाताना अज्ञात चोरट्याने कशाने तरी घरातील वस्तूंना आग लावून दिल्याने घरगुती वापरातील वस्तू जळालेल्या आहेत तसेच वापरते दागिने ठेवलेल्या ठिकाणी मिळून आलेले नाहीत अशी फिर्याद सौ शिवानी शिवाजी कुबल वय ३५ रा. आनंदवाडी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना २७ नोव्हेंबर साय.६ ते ७.४४ च्या मानाने आनंदवाडी येथे घडली या घटनेसंदर्भात अज्ञात आरोपीविरुद्ध भा.द.वी कलम ३८०,४३५४५४,४५७,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दरम्यान आगीचे वृत्त समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेतील चोरीचा तपासा करीता ठसे तज्ञांना पाचारण करण्यात येऊन श्वान पथक देखील दाखल झाले होते.अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.
