अन्यथा दशक्रोशितील ग्रामस्थांसह आमरण उपोषण…

पावणाई सरपंचाचा इशारा; दिलेल्या वेळेत रत्या डांबरीकरण न केल्याने दिला इशारा

*⚡देवगड ता.२८-:* देवगड तालुक्यातील राज्यमार्ग क्रमांक १७७ वाघोटन, बापर्डे ,वानिवडे, पावणाई ,गढिताम्हणे, तळेबाजार, वरेरी प्रजीमा क्र १२ या रस्त्याचे डांबरीकरणाबाबत सरपंच ग्रामपंचायत पावणाई यांनी उपोषणाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने ३० एप्रिल पर्यंत या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता कुडाळ यांनी दिले होते दरम्यान या रस्त्यामधील खड्डे बुजविणे अथवा दुरुस्ती डांबरीकरण करण्यात न आल्याने दशक्रोशीतील नागरिकांसमवेत २ डिसेंबर रोजी आमरण उपोषणाचा इशारा पावणाई सरपंच यांनी दिला आहे. हा रस्ता वाहतुकीस कोणता अयोग्य झाला असून या रस्त्यावरून पादचारी तसेच दुचाकी चारचाकी वाहने या राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा सुरू राहणे अतिशय दुरापास्त झाले असून या मार्गावर छोटे-मोठे अपघात देखील होत आहे एकंदरीत पाहता हा राज्यमार्ग संपूर्ण दशक्रोशीतून जात असून या दशक्रोशीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, महाविद्यालय ,असून या मार्गावर विद्यार्थी तसेच नागरिकांची वर्दळ असते नजीकच येथे आठवडा बाजार असल्याने बाजार दिवशी वाढती वर्दळ वाहनांची गर्दी त्याचप्रमाणे नागरिकांची गर्दी ही परिस्थिती पाहता या रस्त्यावरून प्रवास करणे फार दुरापास्त झाले आहे. वारंवार या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणाची मागणी करण्यात येऊ नये सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दुर्लक्षित त्यामुळे या रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे या रस्त्याच्या खडीकरणं डांबरीकरण करण्याच्या कामास तात्काळ सुरुवात करण्यात यावी.तसेच या मागणी कडे सा.बा विभागाने दुर्लक्ष केल्याने या दशक्रोशीतील नागरिक समवेत २ डिसेंबर २०२१ सकाळी १० वा. पासून आमरण उपोषण तळेबाजार हायस्कुल समोरील भागात सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा सरपंच ग्रामपंचायत पावणाई यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page