कातवड येथे मालवण कृषी सहाय्यक संघटनेने बांधला बंधारा

श्रमदानातून ३६ फूट लांबीचा बंधारा उभारत अडविले पाणी

*⚡ओरोस ता.२८-:* महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना मालवण, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत कातवड यांच्या संयुक्त विद्यमाने कातवड येथे श्री संजय नाईक यांचे घराकडील ओहळवर 36 फूट, लांबीचा स्थानिक साहित्य वापरून पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर बंधारा तेथे उपलब्ध दगड वापरून करण्यात आला, ज्या ठिकाणी माती उपलब्ध नाही अशा ठिकाणी हा बंधारा खूपच उपयुक्त आहे. अशा प्रकारचे बंधारे यापूर्वी श्रमदानाने बांधले आहेत यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री व्ही जी गोसावी सरपंच श्री उदय नाईक,उपसरपंच श्री गणेश चव्हाण कृषी पर्यवेक्षक श्री परब ,श्री गवंडे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री धनंजय गावडे,अमृता भोगले,तालुका अध्यक्ष श्री सुनील कदम, उपाध्यक्ष श्री आनंद धुरी,ग्रामसेवक श्रीमती युती चव्हाण ,कृषी मित्र श्री काशीनाथ चव्हाण, आत्मा सदस्या श्री भाग्यश्री चव्हाण,आत्मा समनव्यक श्री निलेश गोसावी कृषी सहाय्यक धामपूरकर,सौंगडे,गोरे,शिंदे,गीते,तसेच शेतकरी श्री वैभव नाईक,सुजय घाडी संदेश मालवणकर,व इतर ग्रामस्थ उपस्तीत होते

You cannot copy content of this page