Headlines

कर्नाटकचे मंत्री विश्वर आप्पाजी यांची विशाल परब यांनी घेतली भेट

सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाबाबत झाली चर्चा;मंत्र्यांना ज़िल्ह्यात येण्याचे दिले निमंत्रण

*⚡सावंतवाडी ता.२८-:* कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांची महाराष्ट्रातील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी शनिवारी बेंगलौर येथे भेट घेतली. त्या भेटीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक व विकासात्मक दृष्टीने चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा व बेळगाव यांची एक प्रकारे नाळ जुळलेली आहे. कर्नाटक राज्यातील बेळगावहून मोठ्या प्रमाणात भाजी सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला, मालवण, दोडामार्ग सह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होते. दिवसाला चार ते पाच ट्रक भाजी बेळगावमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असते. या भेटीत जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बेळगांवच्या विविध भागातून भाजी व अन्य किराणामाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर येतो. विशाल परब यांनी कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचे आमंत्रण परब यांनी मंत्र्यांना दिले आहे. यावेळी भाजपचे बेळगावचे आमदार संजय पाटील उपस्थित होते.

You cannot copy content of this page