केंद्रशाळा शेर्पेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

*⚡कणकवली ता.२८-:* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी इयतेच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कणकवली तालुक्यातील जि. प. केंद्रशाळा शेर्पेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेतील एकूण ४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.हे चारही विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षे मध्ये चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शेर्पे गावच्या सरपंच निशा शेलार, उपसरपंच अरुण ब्रम्हदंडे,शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे,केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल,शाळेचे मुखुध्यापक दशरथ शिंगारे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास पांचाळ,शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष वीनोद शेलार आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. शेर्पे केंद्रशाळेतील विद्यार्थी कु.अथर्व सत्यविजय सावंत – (३५६ गुण),सिद्धी संजय गर्जे -(२१८ गुण), चिन्मय दशरथ शिंगारे (२१४ गुण),जय सुभाष देवधर – (१४६ गुण) याप्रमाणे 300 गुणांपैकी गुण मिळवून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झालेले आहेत .या विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक अमोल भंडारी ,राजू गर्जे ,दशरथ शिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे पंचक्रोशीत अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page