स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरात सायकल रॅली

नगराध्यक्षासह विद्यार्थी, नागरिकांनी घेतला सहभाग…

*⚡सावंतवाडी ता.२८-:* नगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छताविषयी जनजागृती करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने शहरात आज सकाळी “सायकल रॅली” काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वतः सायकल चालवत झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. यात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, देविदास आडारकर आदींसह मोठ्या संख्येने नगरपालिका कर्मचारी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page