Headlines

चेंदवणमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गौतम चेंदवणकर यांच्या पुढाकाराचे अर्चना बंगे यांच्याकडून कौतुक

कुडाळ : चेंदवण गावातील एकही विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ग्रामपंचायत सदस्य गौतम चेंदवणकर यांच्या पुढाकारातून व मराठा क्लॉथ, कुडाळ यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा चेंदवण क्र. १ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तरांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या वालावल पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, समाजातील इतरांनीही अशा सामाजिक उपक्रमांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात सरपंच वैभव चेंदवणकर यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच वैभव चेंदवणकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण शृंगारे, गौतम चेंदवणकर, सौ. प्रणाली तेंडुलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष भूपेश चेंदवणकर, माजी सरपंच सौ. उत्तरा धुरी, शिल्पा चेंदवणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद भरडकर, पोलीस पाटील उमेश शृंगारे, बाळू कोचरेकर, अण्णा भरडकर, रवि तोरसकर, मुख्याध्यापक मसुरकर, सौ. पाटील तसेच जीवन विद्या मिशनचे महेश दळवी व सौ. मधुरा दळवी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तरांचे वितरण करण्यात आले.

You cannot copy content of this page