कंटेनरला मागून दुचाकीची धडक, दुचाकीस्वार ठार:कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले मृत घोषित..
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर साळीस्ते दरम्यान बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या HR 61 D 1261 क्रमांकाच्या कंटेनरला मागून TVS रायडर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. अपघाताची माहिती मिळताच तळेरे बाजारपेठ मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेने जखमीला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. अपघातग्रस्त दुचाकी ही TVS कंपनीची रायडर असल्याची माहिती मिळाली आहे.
