आपल्या पाठपुराव्यामुळे ‘ती दोन विकासकामे’ लागली मार्गी- आप्पा लुडबे

*⚡मालवण ता.२७-:* मालवण शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेल्या मालवण बसस्थानक ते दलीतवस्ती रस्ता रुंदीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे व डांबरीकरण मंजूर निधी (१५८१,३५९) तसेच हॉटेल महाराजा ते दलीतवस्ती रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण मंजूर निधी (२३,७६९९६) ही दोन कामे मंजूर झाली. या दोन्ही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे मार्गी लागल्याची प्रतिक्रिया नगरसेवक आप्पा लुडबे यांनी देत याबाबत नगरपालिका प्रशासनाचे आभार आहेत. प्रभाग ७ मध्ये विविध विकासकामे होत असताना जनतेच्या मागणीनुसार दोन्ही कामेही मंजूर होण्या बाबत आपण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर दोन्ही कामे मंजूर झाल्याने आपण समाधानी आहोत, असे आप्पा लुडबे यांनी सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या वतीने वाहनतळ कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी देखील आपला पाठपुरावा होता, असेही श्री. लुडबे यांनी निदर्शनास आणून दिले.

You cannot copy content of this page