संविधान दिनी काँग्रेसकडून बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

*⚡मालवण ता.२७-:* भारतीय संविधान दिनानिमित्त मालवण तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने मालवण बांगीवाडा येथील समाजमंदिरात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्त्या पेटवून अभिवादन करत त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यात आला. हा इतिहास व संविधान अजरामर रहावे आणि भविष्यातील युवा पिढीसाठी देखील हा दिवस प्रकाशमय व्हावा या मेणबत्ती लावून बाबासाहेबांच्या कर्तुत्वाला वंदन करत आहोत, अशी भावना यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी व जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी विचार मांडत मार्गदर्शन केले. यावेळी मालवण युवक शहरअध्यक्ष गणेश पाडगावकर, संत रोहिदास समाज शहर अध्यक्ष हरेश चव्हाण, नितीन चव्हाण, देवेंद्र चव्हाण, तालुका काँग्रेस महिला अध्यक्षा ममता तळगावकर, योगेश्वर कुर्ले, बाळकृष्ण जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page