भाजपा जिल्हा कार्यकारिणीची उद्या कणकवलीत बैठक

केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे मार्गदर्शन करणार

*कणकवली ता.२२-:* सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक मंगळवार 23 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता
कणकवली प्रहार भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे व मान्यवर मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व मोर्चा/आघाडी जिल्हाअध्यक्ष,जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष,विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सभापती,उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,मंडल अध्यक्ष, सरचिटणीस यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.

You cannot copy content of this page