शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर : निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेला मिळाला पूर्णविराम
*⚡बांदा ता.२२-:* बांदा ग्रामपंचायतिच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये जाहीर झालेल्या पोटणीवडणुकीसाठी शिवसेना उमेदवार देणार असून यासाठी चाचपणी सुरू असल्याचे शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांनी सांगितले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सद्यस्थितीत बांदा ग्रामपंचायतीत भाजपचे वर्चस्व आहे. सरपंच अक्रम खान हे थेट सरपंचपदी निवडून गेल्याने प्रभाग क्रमांक ४ मध्ये रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. बांदा शहरात ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र याठिकाणी शिवसेनेने उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. उमेदवार चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे काणेकर यांनी सांगितले.
