*⚡कणकवली ता.१६-:* महाराष्ट्राचा सर्वात प्राचीन सांस्कृतिक ठेवा म्हणजे भजन आहे. महाराष्ट्राचा हा अमूल्य ठेवा जतन करणे , त्याचा प्रसार करणे , वृद्धिंगत करणे यासाठी अनेक भजनप्रेमी , वारकरी माऊली यांचे योगदान आहे. भजनाला अध्यात्मिक अधिष्ठान आहे.घावनळे गाव रहिवाशी संघ मुंबई व ग्रामस्थ मित्रपरिवाराच्या पदसेवकांच्यावतीने “गजर हरिनामाचा ” या नावाने अभंग वाणी भजन महोत्सव व सत्यनारायणाची महापूजा २८ नोव्हेंबरला मराठा मित्र मंडळ , मुलुंड ( पूर्व ) मुंबई येथे होणार आहे. फक्त गावातील भजन मंडळे व मुंबई स्थित ग्रामस्थ भजन मंडळे यात सहभागी होणार आहेत . इथे कोणतीही स्पर्धा नाही, सर्व भजन मंडळीनी एकत्र येऊन हा गावाच्या दृष्टीने , जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक भजन महोत्सव सोहळा होणार आहे. भजन प्रेमी यांना एकत्र करून १२ तास एकत्र पणे नामस्मरण , सादरीकरण व एकोप्याने विचार विनिमय एवढाच उदात्त हेतू ठेऊन हा कार्यक्रम ठेवला आहे . गावातील भजन मंडळी व आयोजक मंडळी यांच्यात समन्वय व संपर्क यासाठी भजन बुवांची एक समिती कार्यरत आहे . यात बुवा श्री.कानडे , बुवा श्री. भदूजी ( दादा ) मेस्त्री , बुवा राजन सावंत , बुवा प्रणिल नार्वेकर व हभप मनोज खोचरे ही मान्यवर मंडळी असतील . या महोत्सवाचे उदघाटन भजनसम्राट गुरुवर्य भगवान लोकरे बुवा आणि प्रमोद हरियाण बुवा आणि कोकणातील एक नामवंत पखवाज वादक डॉ.दादाजी परब यांच्या उपस्थितीत होणार आहे. या भजन महोत्सवाबाबत नामदेव घाडीगांवकर , रामचंद्र पालव , जयंत चव्हाण , बाळा कर्पे , एकनाथ खोचरे , नागेश पारकर , धर्माजी जाधव , सुदर्शन बागवे , यशवंत सावंत , उमेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुबंई मुलुंड येथे २८ नोव्हेंबरला गजर हरिनामाचा भजन महोत्सव
