तनुश्री मसुरकर राज्य गुणवत्ता यादीत तृतीय
*⚡कणकवली ता.१६-:* इंडियन टॅलेंट सर्च, वरळी मुंबई मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत कनेडी हायस्कूलने घवघवीत यश संपादन करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कु.तनुश्री प्रसाद मसुरकर हिने राज्यगुणवत्ता यादित तृतीय क्रमांक प्राप्त केला असून शिष्यवृत्तीची मानकरी ठरली असून भारताची अव्वल धावपटू तसेच ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. टी. उषा यांच्या मार्फत सन्मानपत्र, सुवर्णपदक, शिष्यवृती धनादेश देऊन कु. तनुश्री हिस सन्मानित करण्यात आले. तसेच प्रशालेतील कु.अपूर्वा चारुहास आडकर हिने हिने देखील इंग्रजी या विषयात विशेष प्राविण्य मिळवले असून कुमारी अपूर्वा हिस सन्मानपत्र आणि सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत प्रशालेतील साठ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातील पंधरा विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले असून प्रशालेतील दोन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल प्रशालेला गोल्डन स्कूल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तर प्रशाला मुख्याध्यापक एस डी दळवी सर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि प्रमुख पी. एन. मसुरकर यांना देखील गौरविण्यात आले आहे. प्रशालेच्या या सुवर्णमय यशाबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष सतीश सावंत, सरचिटणीस सुरेश सावंत आणि पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन एल. डी. सावंत आणि पदाधिकारी, प्रशाला मुख्याध्यापक एस. डी. दळवी , पर्यवेक्षक बुराण , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रसाद मसुरकर यांचे विशेष मार्गदर्शन या विद्यार्थांना लाभले असून सर्व स्तरातून विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
