महिलांनी छेडछाडीचे प्रकार खपवून घेऊ नका

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे;आचरा पोलीस स्टेशनला शांतता समितीची बैठक संपन्न

*⚡मालवण ता.१५-:* महिलांनी शिट्या मारणे, छेडछाड काढण्याचे प्रकार खपवून घेऊ नका यातूनच पुढे अँसिड फेकणे, रेप होणे सारखे मोठे गुन्हे होऊ शकतात. यासाठी असे प्रकार तातडीने पोलीसांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आचरा पोलीस स्टेशनला झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले. यावेळी आचरा सरपंच प्रणया टेमकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, मनिष कोल्हटकर, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, विद्यानंद परब,ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर,आचरेकर, मोहल्ला समितीचे रियान काझी, जाफरूल्ला काझी, जावेद शेख पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण, अक्षय धेंडे, मिनाक्षी देसाई, भगत,मनोज पुजारे यांसह अन्य महिला, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी उपस्थितांना पोस्को कायद्याबाबत माहिती देवून शाळा,काँलेजमध्ये लहान मुलांशी गैरवर्तन झाले तर मुख्याध्यापक तक्रार करु शकतात मात्र असे प्रकार लपविण्याचे प्रकार घडल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल होवू शकत असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी बालमजूर कामावर ठेवू नका अशा सुचना पोलीस अधिक्षकांनी केल्या. यावेळी तरूणांनी पोलीस सेवेत दाखल होण्याचे आवाहन करून स्पर्धा परीक्षेत बसू इच्छिणाऱ्या तरुणां सहकार्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचे श्रावण गाव भेटी दरम्यान श्रावण ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page