कंगना राणावत यांचेवर गुन्हा दाखल करा

देवगड तालुका शिवसेनेची मागणी

*⚡देवगड ता.१५-:* देवगड अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून त्या व्यक्तव्यामुळे देशाचा अपमान तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्यावर आयपीसी ५०४,५०५,१२४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देवगड तहसीलदार,देवगड पोलीस निरीक्षक यांचेकडे केली आहे. तसेंच देवगड तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे लैगिक शोषण,करणाऱ्या आरोपीवर कारवाई करणेत यावी व हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात येऊन आरोपींना कडक शासन करण्यात यावे . या बरोबरच तालुक्यातील कोटकामते गावातील मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन नजीकच्या गावातील एका प्रथम नागरिक यांनी शांतता सलोखा न राखता मारहाण प्रकरण करून पलायन केले .व गावात बाहेरील गुंड आणून दहशत निर्माण करीत आहेत .त्याचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ही देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने देवगड पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,यांचेकडे केली आहे . यावेळी तालुका प्रमुख विलास साळसकर,मिलिंद साटम,सभापती रवींद्र जोगल ,महिला आघाडी प्रमुख वर्षा पवार,प्रगती तेली,स्वप्नाली वाल्मिकी,दिव्या कातवणकर,उपतालुकाप्रमुख बुवा तारी, विभाग प्रमुख रमाकांत राणे,संदीप डोळकर श्रीकांत मल्हार निनाद देशपांडे,माजी उपसरपंच जहिर ठाकूर,नगरसेवक विकास कोयंडे, शरद लोके,सौरभ माने तुषार पेडणेकर आदी उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, अभिनेत्री कंगना राणावत यांनी नुकतीच टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात प्रकट मुलाखत दिली. सदर मुलाखतीमध्ये कंगना राणावत यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करून असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा जाहीर अपमान केला आहे. कंगना राणावत यांनी देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालेले नसून ती एक भीक होती व देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले असे विधान करून भारतीय स्वातंत्र्यलयात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे चारित्र्यहनन केले आहे, तसेच भारतीय नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. सदरच्या वक्तव्यामुळे देशवासीयांच्या भावना दुखावल्या असल्याचे नमूद केले आहे तत्पूर्वी देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांनी शिवसेना कार्यालय ते पोलीस स्टेशन,तहसीलदार कार्यालय असे मोर्चाने घोषणाबाजी करीत येत निवेदन सादर केले.

You cannot copy content of this page