देवगड आगारात संप सुरूच

शिवसेना कामगारांच्या पाठीशी न्याय मिळवून देणारा;शिवसेना भाजप पदाधिकारी एकाच वेळी पाठींबा

*⚡देवगड ता.१५-:* रापम महामंडळाच्या देवगड आगारातील सर्व कर्मचारी प्रामुख्याने चालक वाहक,यांत्रिक कर्मचारी ,वहातुक नियंत्रक,लिपिक यांनी गेली सात दिवस सुरू ठेवलेला संप सोमवारी देखील सुरू असून या संपातील कामगारांना कामावर रुजू होण्याच्या सूचना आल्याचे कळते परंतु कामगार वर्गाने एकजूट दाखवीत कामावर रुजू न होण्याचा निर्णय घेतला असतानाच शिवसेना भाजप पदाधिकारी यानी एकाच वेळी संपकर्त्याना भेट दिली व संपास पाठींबा व्यक्त केला. दरम्यान शिवसेना तालुका पदाधिकारी यांनी कामगार वर्गाची भेट घेऊन संपास पाठींबा व्यक्त केला .व शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री ,परिवहन मंत्री यांच्या कडे मागणी करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले तालुका प्रमुख विलास साळसकर,मिलिंद साटम,माजी सभापती रवींद्र जोगल,उपतालुका प्रमुख निवृत्ती तारी, महिला आघाडी प्रमुख वर्षा पवार,प्रगती तेली,दिव्या कातवण कर स्वप्नाली वाल्मिकी,माजी प.स.सदस्य सुनील तिरलोटकर उपसरपंच जहिर ठाकूर,रमाकांत राणे,संदीप डोळकर संपस्थळी भेट देऊन कामगार वर्गाशी चर्चा केली .कामगारांची वेतन व अन्य भत्ते,तसेच विलनिकरण मागणी ही रास्त असून एसटी कामगार हा ग्रामीण भागातील जनतेचा सेवक आहे .व ग्रामीण भागाशी त्याची नाळ जोडली असल्याने प्रवासी वर्गाचे हाल होत असले तरी त्यांच्या पाठीशी निश्चित आहे.भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,सामाजिक कार्यकर्ते,भाई नरे,नगरसेवक नीरज घाडी,शैलेश लोके यांनी पाठींबा व्यक्त केला.

You cannot copy content of this page