हवामान आधारित निकष बदलल्याने आबा , काजूशेतकऱ्यांचा होणार फायदा

*⚡कणकवली ता.१३-:* प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत कोकणातील आबा , काजू व केळी या पिकांचा सामावेश होतो . गेल्या चार ते पाच वर्षात हवामानातील बदलामुळे उप्तादनात विपरित परिणाम होत आहे . मात्र फळ पिक विमा योजनेमुळे शेतक – यांच्या उत्पादन काही अंशी मदत होत आहे . चालू वर्षी आंबा व काजू या पिकापोटी जिल्हयातील २२,८५७ शेतकऱ्यांनी रु . ६.९ ७ कोटी एवढी विमा हप्त्याची रक्कम शासनाकडे भरलेली होती . त्यापोटी हवामानातील निकषांस अनुसरून जिल्ह्यातील आंबा व काजू पिक उत्पादक शेतकऱ्यांना रु .५१.७१ कोटी एवढी रक्कम प्राप्त झाली आहे . यापैकी जिल्हा बँकेकडे ६,३०५ सभासदांना रू .१ ९.९ ३ कोटी एवढी नुकसान भरपाई मिळालेली आहे . अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली हवामानातील असणारे अवेळी पाऊस व तापमान या निकषांमध्ये बदल करण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेवून मा.खासदार तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती . त्यास अनुसरून गतवर्षी माहे नोव्हेंबर २०२० मध्ये संबंधित खात्याचे अधिकारी तथा पदाधिकारी यांची सभा घेवून निकषात बदल करण्याची विनंती करण्यात आलेली होती . मा . मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मा.कृषीमंत्री दादा भुसे यांनी संबंधित कंपनीशी चर्चा करून चालू वर्षासाठी निकषामध्ये सुधारणा केलेल्या आहेत . पुढील ३ वर्षासाठी सदर सुधारीत निकष लागू राहणार असून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत केळी , आंबा व काजू या पिकांसाठी विमा उतरविला जाणार आहे . कोकणात प्रामुख्याने हंगामात अवेळी पाऊस व वाढलेल्या तापमानामुळे नुकसान होते . पूर्वीच्या निकषाप्रमाणे अवेळी पावसामध्ये ०१ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये २५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास शेतकरी नुकसानीस पात्र होता . मात्र आता पावसाचे प्रमाण १० मि.मी. असल्यास शेतकरी नुकसान भरपाईस पात्र होणार आहे . तसेच जास्त तापमानमध्ये ३ दिवसामध्ये ३७ डिग्रीपेक्षा जास्त तापमान झाल्यास गतवर्षी असणाऱ्या रू .६,१०० / – नुकसान भरपाईमध्ये वाढ होवून ती आता रू .१४,१०० / – मिळणार आहे . आंब्यासाठी हेक्टरी विमादर रू . ७,००० / – तर काजूसाठी रु .५,००० / – एवढा असून , एक शेतकरी ४ हेक्टरपर्यंत योजनेत सहभागी होवू शकतो . यापूर्वी जिल्हयातील ३ ९ महसूल मंडळामार्फत कार्यवाही होत होती मात्र मा . आमदार वैभव नाईक व जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री . सतिश सावंत यांनी जिल्हयाचे पालकमंत्री मा.श्री . उदयजी सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून महसूल मंडळात वाढ करून घेतली आहे . आता महसूल मंडळांची संख्या ५८ एवढी झालेली असून , त्याचा लाभ जिल्हयातील शेतकऱ्यांना मिळणार आहे . सद्याच्या बदलत्या हवामानाचा विचार करता , आंबा – काजू पिकासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षणाची नितांत आवश्यकता आहे . कर्जदार शेतकऱ्यांनी कलम बाग असलेल्या ठिकाणचा जिओ टॅगींग फोटो मागाहून दिल्यास चालू शकेल . यावर्षी सदर विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर २०२१ असून , तत्पूर्वी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावयाचे आहे . शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यास अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच विमा हप्ता भरण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री . सतिश सावंत यांनी केलेले आहे .

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सवांत यांनी दिली माहिती

You cannot copy content of this page