मालवण येथील देवळात काकड आरतीना प्रारंभ…

मालवणातील वातावरण भक्तिमय…

*⚡मालवण ता.१२-:* मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर – नारायण ,यांच्यासह मालवण भरड येथील प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिर, मेढा येथील मुरलीधर मंदिर, गवंडीवाडा येथील राममंदिर, धुरीवाडा येथील खोत मठ व इतर काही देवालयात काकड आरतीला प्रारंभ झाला असून पहाटेच्यावेळी होणाऱ्या या काकड आरतीने मालवणातील वातावरण भक्तिमय झाले आहे. आश्विन पौर्णिमेपासून जिल्ह्यातील काही ग्रामदेवतेच्या मंदिरात काकड आरतीला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार ही काकड आरती केली जात आहे. मालवणात मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण तसेच भरड येथील श्री दत्त मंदिरात आणि मेढा येथील मुरलीधर मंदिर, गवंडीवाडा येथील राममंदिर, धुरीवाडा येथील खोत मठ व इतर काही मंदिरांमध्ये काकड आरती सुरु आहे. पहाटेला सर्वसाधारणपणे ५ वाजल्यापासून सुरु होणारी ही आरती दीड – दोन तास चालत आहे. यामध्ये भुपाळी, काकडा, भजन, आरती, देवतांना मंगलस्नान असे कार्यक्रम होत आहे. कोरोनाचे नियम पाळून होणाऱ्या या काकड आरतीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसाची सुरुवात पहाटेच देवाच्या नामस्मरणाने होत असल्याने परिसरातील वातावरणही सुखद झाले आहे.

You cannot copy content of this page