कणकवली ता.१२ कणकवली तालुक्यातील तरंदळे येथे श्री ओम साई सह.दूध उत्पादक संघ तरंदळे या नावाने दूध डेअरी स्थापन करण्यात आली.यावेळी ४० शेतकरी उपथित होते. गोकुळ दूध संघाचे राजेश गावकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.युवकांनी नोकरीच्या मागे न लागता दूध व्यववसायामध्ये होणारे फायदे ,नोकरीच्या दुप्पट होणारा नफा शासनाच्या सवलती सर्वांना समजावून सांगितल्या .सघाचे अध्यक्ष म्हनुन तेजस सावंत ,सचिव अजित सावंत ,खजिनदार समीर सावंत यांची निवड करण्यात आली.यावेळी अशोक सावंत व मधुसूदन सावंत यांनी मार्गदर्शन केले.शेवटी दूध संघ स्थापन करण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.
तरंदळे श्री ओम साई सहकारी दूध उत्पादक संघ स्थापन; अध्यक्षपदी तेजस सावंत
