पालकमंत्री उदय सामंत, आ दीपक केसरकर राहणार उपस्थित
वेंगुर्ले वेंगुर्ले नूतन पंचायत समिती इमारत उद्घाटन मंगळवार १६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व आमदार दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मंजू मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी जि.प. सदस्य समिधा नाईक, नितीन शिरोडकर, विष्णुदास कुबल,प्रितेश राऊळ तसेच पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, उपसभापती सिद्धेश परब,पं. स.सदस्य यशवंत परब, सुनिल मोरजकर, श्यामसुंदर पेडणेकर, मंगेश कामत,गौरवी मडवळ, प्रणाली बंगे, साक्षी कुबल, स्मिता दामले,जि. प.बांधकाम कार्यकारी अभियंता दत्तात्रय सावंत आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती अनुश्री कांबळी व गटविकास अधिकारी उमा पाटील घारगे यांनी केले आहे.
