सिंधुदुर्गात उद्या, परवा मतदार यादी नोंदणी विशेष कार्यक्रम

२७ व २८ नोव्हेंबरला दुसरा टप्पा निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ जयकृष्ण फड यांची माहिती

*⚡ओरोस ता.१२-:* निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२२ या तारखेच्या आधारावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ व १४ आणि २७ व २८ या चार दिवशी छायाचित्रांसह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तसेच अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी ५ जानेवारी रोजी होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ जयकृष्ण फड यांनी दिली आहे. यानुसार नमुना नं ६ मध्ये नव्याने मतदार नोंद करणे. नमुना नं ७ मध्ये मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार यांचे यादीतील नाव वगळणे. नमुना नं ८ मध्ये मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलात दुरुस्ती करणे. नमुना नं ८ अ मध्ये मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणी करणे हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी, तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना नियुक्त करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ फड यांनी दिली आहे. याकरिता १ नोव्हेंबर रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली आहे. तसेच दावे व हरकती स्वीकारण्यास १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला असून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. छायाचित्रांसह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम १३ व १४ नोव्हेंबर आणि २७ व २८ नोव्हेंबर राबविला जात आहे. २० डिसेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. ५ मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ फड यांनी देताना जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घेऊन मतदार यादी अधिकाधिक योग्य होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page