रवळनाथ सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे भाजपकडून स्वागत

रवळनाथ सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे भाजपकडून स्वागत

वैभववाडी प्रतिनिधी एडगांव येथील रवळनाथ सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन सुनील रावराणे तसेच व्हा. चेअरमन श्रीधर घाडी यांचा वैभववाडी भाजपाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एडगांव सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. यावेळी सुनील रावराणे व श्रीधर घाडी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दोघांचे अभिनंदन केले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, संचालक जयेंद्र रावराणे, माजी सभापती दिलीप रावराणे, संचालक प्रमोद रावराणे, मजूर फेडरेशन संचालक सुनील भोगले, विनोद रावराणे, राजेंद्र रावराणे, प्रकाश शेलार, संचालक सचिन रावराणे, अशोक रावराणे, गंगाराम आडुळकर, गंगाराम वनकर, सदा गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो : एडगांव सोसायटीचे नूतन चेअरमन सुनील रावराणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना वैभववाडी भाजपा पदाधिकारी.

You cannot copy content of this page