उंबर्डे -फोंडा रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा उद्या शुभारंभ

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सुरू होणार काम

वैभववाडी प्रतिनिधी उंबर्डे-फोंडा रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम उद्यापासून १३ नोव्हेंबर ला सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक यांनी पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार पाहणी केली.खड्डे बुजवून हे काम होणार असल्याचे सौ.नाईक यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या उंबर्डे-फोंडा रस्त्याच्या नुतणीकरण कामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी ७६ लाख रुपये मंंजुर झाले आहेत.त्यामध्ये १९ किमी लांबीच्या रस्त्याचे काम करायचे आहे. मात्र हे काम करीत असताना रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून हे काम करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे मंगेश लोके यांनी केली होती. येथील कार्यकारी अभियंता यांनी खड्डे बुजवून काम करणे शक्य नसल्याचे सांगत, खड्डे बुजविण्यासाठी निधीच उपलब्ध होणार नसल्याचे विधान केले होते. रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी खड्डे बुजविणे गरजेचे असल्याचे मंगेश लोके यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अधिक्षक अभियंता यांना या संपूर्ण रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सौ.नाईक यांनी शुक्रवारी उंबर्डे ते फोंडा या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली.या रस्त्याचे खड्डे डांबराने बुजवून व गटार मारून रस्ता सुस्थितीत करण्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या. यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य संभाजी रावराणे,बँक संचालक दिगंबर पाटील,कार्यकारी अभियंता श्री. शेवाळे, उपअभियंता कांबळे, शाखा अभियंता धुडये,शाखा अभियंता श्री. सुतार,ठेकेदार सुधाकर साळुंखे,देवानंद पालांडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page