तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले स्वागत
सावंतवाडी-: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त प्रभारी विनायक देशमुख यांच सावंतवाडी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्वागत केले. गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, विल्यम सालढाणा, समिर वंजारी, किरण टेंबुलकर, कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.
