दोन दिवसात अहवाल न दिल्यास शेतकऱ्यांना घेऊन कृषी कार्यालयात घुसणार

सिलिका वॉशिंगचे गढूळ पाणीप्रश्नी उपसभापती प्रकाश पारकर व हर्षदा वाळके यांच्यात रंगला सामना

*⚡कणकवली ता.१२-:* शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान झाले तेव्हा कृषीचे कर्मचारी घरी असतात, फोन बंद करतात, कृषीचे कर्मचारी गावात फिरत नाहीत असा आरोप दिलीप तळेकर यांनी केला. प्राथमिक अहवाल दोन दिवसात मंगळवार पर्यत सादर करतो. असे कृषी अधिकारी धीरज तोरणे यांनी सांगितले. पण भात कापणी झाली मग आता कसा अहवाल देणार असा सवाल सदस्यांनी करत धीरज तोरणे यांना धारेवर धरले. जर दोन दिवसात अहवाल नाही दिला तर शेतकरी घेऊन तुमच्या कार्यालयात येणार. असा इशारा दिलीप तळेकर यांनी दिला.दिला व कृषी विभागाचा कारभार उघड केला.सिलिका वॉशिंग प्लाटबाबत हर्षदा वाळके व उपसभापती प्रकाश पारकर यांच्या प्रश्नोत्तरी सामना ही रंगला. कणकवली प स ची बैठक लोरे येथील ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, लोरे सरपंच अजय रावराणे, सहाय्यक गटविकास अधिकारी अभिजित हजारे, सुजाता हळदिवे, दिलीप तळेकर, गणेश तांबे, मंगेश सावंत, महेश लाड, तृप्ती मालवडे, हर्षदा वाळके,स्मिता मालडीकर, मिलींद मेस्त्री, दिव्या पेडणेकर, सुचिता दळवी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सिलिका वॉशिंग प्लाटचे पाणी पियाळी नदीपात्रात सोडले जाते. नदी किनाऱ्यावरील नळयोजना अवलंबून आहेत. उपसभापतीनी मागच्यावेळी नळयोजने करिता पंप उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपसभापतीकडून मला उत्तर अपेक्षित आहे असे सांगत पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर उपसभापती प्रकाश पारकर यांनी जुना पंप आपण दिल्यास आपल्याला नवीन पंप दिला जाईल असे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी हर्षदा वाळके व प्रकाश पारकर यांच्या प्रश्नोत्तरी सामना ही रंगला. अखेर सभापतींनी याप्रश्नी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. सभापती मनोज रावराणे यांनी सभेतील मुद्द्यांच्या पूर्ततेबाबत लवकरात लवकर कार्यवाही करा असे आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. कणकवली तालुक्यात पोलीस पाटील पदे रिक्त असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या बाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची गरज असल्याची मागणी प. स. सदस्य दिलीप तळेकर यांनी केली. माईण येथील गाळयाबाबत अजून किती दिवस लागणार असा सवाल गणेश तांबे यांनी केला. तसेच त्या गाळ्यांचे निर्लेखन किती दिवसात होईल, असा प्रश्न त्यांनी केला. या बाबत तालुक्यातील सर्वच निर्लेखित इमारतीचा सर्व्हे करून निर्णय घेऊया असे मनोज रावराणे यांनी सांगितले. महावितरणकडून वीज बिल वसुली नावाखाली गरीबावर कारवाई नको अशा सूचना मनोज रावराणे यांनी दिल्या. तालुक्यात महावितरणची दबंगगिरी सुरू आहे., गरीबावर कारवाई नको, सवलत द्या, शासनांच्या भूलथापामुळे लोक भरायची राहिली अशी भूमिका सुजाता हळदिवे, दिलीप तळेकर यांनी मांडली. जि. प. रस्त्यावरील खड्डे व झाडी मारण्याची मागणीबाबत काय झाले? असा सवाल सदस्यांनी केला. हे बहुतांशी काम केले अशी माहिती उपअभियंता आर. पी. सुतार यांनी दिली. राहिलेल्या झाडी मारणे व जाभ्या दगडाने खड्डे बुजवा असे आदेश मनोज रावराणे यांनी दिले. वागदे, ओसरगाव साकवाबाबत काय झाले? असा सवाल सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी केला. त्यावर सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांकडून डीपीडिसीकडून सूचना आल्यावर करणार. असे सांगण्यात आले. या संदर्भात डीपीडिसीचा संबंध काय? अनियमितता झाली म्हणून पत्रव्यवहार केला. पण आम्ही उपोषणाला बसणार. जाणून बुजून हे लाबवल जातेय असा आरोप मिलींद मेस्त्री यांनी केला. गेल्या मिटींगला विषय घेऊनही निर्णय होत नाही. ग्रामस्थ प्रश्न विचारतात. असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. भरणीमधील विहिरीच्या मुद्यावर गणेश तांबे आक्रमक झाले. रोजगार हमी योजनेतील कार्यपद्धती संदर्भात त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर मी महिती घेत पूर्तता करतो असे आश्वासन बीडीओनी दिले. कृषी व एकात्मिक बालविकास विभागाचा आढावा घेतला. 1 हजार वनराई व कचे बंधारेचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 2020 पासून 2021 पर्यत देवधर धरण कालव्याचे काम झाले नाही. भु संपादन करताना अल्प मोबदला दिल्याने काम थाबले. त्यामुळे तातडीने निर्णय घ्या अशी मागणी दिलीप तळेकर यांनी केली. हिवाळे आरोग्य केंद्रात फोंडा आरोग्य कर्मचारी तात्पुरते घेतले असताना अजून का सोडत नाही, डॉक्टरांना अधिकार आहे का? असा सवाल सुजाता हळदिवे यांनी उपस्थित करत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत ते हजर झाले पाहिजे अशी सूचना हळदिवे यांनी मांडली. तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहिल्याबद्दल व लोरे सरपंच यांनी बैठकीचे आयोजनासाठी व्यवस्थाकेल्याबद्दल मनोज रावराणे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page