वैभववाडी प्रतिनिधी उंबर्डे गावचे सुपुत्र अनंत नि. सर्वणकर यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळे गटाकरिता आयोजित करण्यात येत आहे. तरी सहभागी स्पर्धकांनी दि.14 नोव्हेबर 2021 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले निबंध खालील नमूद पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठवावे. निबंध स्पर्धेचा विषय – धर्म म्हणजे काय ? आज प्रबोधनाची खरी गरज – गट – विद्यार्थी (ज्युनियर व सिनिअर काॅलेज) शब्द मर्यादा 200 ते 300 शब्द, शिक्षक ( प्राथमिक ,माध्यमिक, उच्चमाध्यमिक, प्राध्यापक) 400 ते 500 शब्द, सर्वसामान्य गट – 300 ते 400 शब्द, प्रत्येक गटा साठी प्रथम क्रमांकास 1 हजार 500 रु. द्वितीय क्रमांकास 1 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 500 रु. देवून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील नियम – निबंध स्वहस्ताक्षरात लिहणे, पेपर A4साईजचा वापरणे, वैयक्तिक माहीती मुखपृष्ठ साठी स्वतंत्र पेपर घेवून त्यामध्ये गट, स्वतः चे नाव, गट एक व दोन साठी शाळेचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, निबंध मराठी भाषेत लिहणे, निबंध पाठविण्यासाठी पत्ता – श्रीमती माई सरवणकर, माजी सभापती, रा. उंबर्डे नायदेवाडी ता. वैभववाडी, श्री शेरपुद्दीन महमंद बोबडे सरपंच ग्रामपंचायत उंबर्डे, ता. वैभववाडी जि. सिंधुदुर्ग. वेळेनंतर आलेले निबंध स्वीकारले जाणार नाही, स्पर्धेसाठी आलेले निबंध परत दिले जाणार नाहीत. परिक्षक यांचा निर्णय अंतिम असेल, स्पर्धेत सर्व नियम आणि अन्य बाबत काही बदलाबाबत अधिकार आयोजकांकडे असेल, स्पर्धेचे बक्षीस वितरण स्मृती दिनी दि. 19/11/2021रोजी उंबर्डे ग्रामपंचायत याठिकाणी होईल. अधिक माहितीसाठी शेरपुद्दीन बोबडे( सरपंच) 9421144741, प्रदिप दळवी (चेअरमन,उंबर्डे हायस्कुल) 9819311292, शशीकांत पवार ( .निवृत्त पोलिस.अधिकारी ) 97731 92609 यांच्याशी संपर्क साधावा. तरी इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
अनंत सर्वणकर स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा
