मिरी पीक काढणी, प्रक्रिया उद्योग याबाबत घेतली माहिती
मालवण दि प्रतिनिधी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थींना विविध ठिकाणचे अभ्यासदौरे करणे अनिवार्य आहे. याच कार्यक्रमांतर्गत सदर प्रशिक्षणार्थींना बांदिवडे येथील प्रगत शेतकरी मिलिंद प्रभू यांच्या मिरी लागवड क्षेत्रावर भेट देत मिरी पीक, काढणी व प्रक्रिया उद्योग तसेच सुरू असलेले संशोधन प्रकल्प याबाबत माहिती घेतली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे मृद शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रकल्प माहिती दिली. मिरी बागेचे व्यवस्थापक संतोष घाडीगांवकर यांनी बागेचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते याची सविस्तर माहिती दिली. सुमारे चाळीस प्रशिक्षणार्थी यावेळी सहभागी झाले होते. संतोष घाडीगांवकर यांनी सर्वांचे आभार मानले. कृषी विज्ञान केंद्र किर्लोसच्या प्रशिक्षणार्थीनी बांदिवडे येथील प्रगत शेतकरी मिलिंद प्रभू यांच्या मिरी लागवड क्षेत्रावर भेट देत मिरी पीक, काढणी व प्रक्रिया उद्योग तसेच सुरू असलेले संशोधन प्रकल्प याबाबत माहिती घेतली.
