एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

*⚡मालवण ता.०९-:* विविध मागण्यांसाठी एसटी बस कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनास राज्य स्तरातून वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा दिला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी मालवण तालुकाध्यक्ष अक्षय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणारी हेळसांड आणि यामुळे आता पर्यंत ३२ कर्मचाऱ्यांचा आत्महत्या यांच्या विरोधात तसेच एसटी महामंडळ हे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करण्याचा मागणीसाठी राज्यातून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी कर्मचारी खऱ्या अर्थाने सेवा बजावत असताना आज राज्यसरकार कडून अशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या या राज्यशासनाने पूर्ण कराव्यात, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी सरकारला करीत आहे. तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही अक्षय कदम यांनी म्हटले आहे. तसेच सदर मागण्या राज्यसरकारने विनाविलंबा मान्य कराव्या अन्यथा वचित बहुजन आघाडी आंदोलनात सक्रिय सहभाग घेईल आणि यावेळी कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशाराही अक्षय कदम यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page